Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 24

गण. 24:14-21

Help us?
Click on verse(s) to share them!
14तर आता पाहा. मी माझ्या मनुष्यांकडे परत जात आहे. पण मी तुला एक इशारा देतो. इस्राएलाचे हे लोक भविष्यात तुला आणि तुझ्या लोकांस काय करतील ते सांगतो.
15बलामाने हा संदेश सांगण्यास सुरवात केली. तो म्हणाला, बौराचा मुलगा बलाम बोलतो, ज्या मनुष्याचे डोळे सताड उघडे आहेत.
16हा संदेश जो कोणी देवाकडून ऐकतो, ज्याला परात्परापासूनचे ज्ञान आहे, ज्याला सर्वसमर्थापासून दर्शन आहे, जो डोळे उघडे ठेवून दंडवत घालतो.
17मी त्यास पाहीन, पण तो आता इथे नाही. मी त्याच्याकडे पाहीन, पण तो जवळ नाही. याकोबातून एक तारा बाहेर येईल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल. तो मवाबाच्या नेत्यांना चिरडून टाकील आणि शेथाच्या सर्व मुलांचा तो नाश करील.
18नंतर अदोम इस्राएलाचे वतन होईल, आणि सेईरही आपल्या इस्राएली शत्रूंचे वतन होईल, ज्याला इस्राएल आपल्या पराक्रमाने जिंकेल.
19याकोबाच्या घराण्यातून एक राजा येईल तो त्यांच्यावर राज्य करील, आणि तो त्यांच्या शहरातील उरलेल्यांचा नाश करील.
20नंतर बलामाने अमालेकाकडे पाहिले आणि त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “अमालेकी एकदा राष्ट्रांत महान होता, पण त्याचा अंतीम शेवट नाश होईल.”
21नंतर बलामने केनीकडे पाहिले आणि त्याने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, “तू जेथे राहतोस ती जागा बळकट आहे, आणि तुझे घरटे खडकात आहे.”

Read गण. 24गण. 24
Compare गण. 24:14-21गण. 24:14-21