Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 8:8-13 in Marathi

Help us?

1 राजे 8:8-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे दांडे इतके लांब होते की परमपवित्र गाभाऱ्यापुढच्या भागात उभे राहणाऱ्यालाही त्यांची टोके दिसत. बाहेरुन पाहणाऱ्याला मात्र ती दिसत नसत. हे दांडे अजूनही तेथे आहेत.
9 कराराच्या कोशाच्या आत दोन पाट्या होत्या. होरेब येथे मोशेने हे पेटीच्या आता ठेवले होते. इस्राएली लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर होरेब या ठिकाणी परमेश्वराने त्यांच्याबरोबर करार केला होता.
10 परमपवित्र गाभाऱ्यात पवित्र कराराचा कोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले, त्याबरोबर परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.
11 परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेले, व मेघामुळे याजकांना उभे राहता येईना.
12 तेव्हा शलमोन म्हणाला, “परमेश्वर म्हणाला आहे की, मी निबीड अंधारात वस्ती करीन.
13 परंतु तुला युगानुयूग राहण्यासाठी, हे मंदिर मी तुझ्यासाठी बांधले आहे.”
1 राजे 8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी