Text copied!
Bibles in Marathi

1 राजे 6:13-18 in Marathi

Help us?

1 राजे 6:13-18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 मी इस्राएल लोकांमध्ये राहील आणि त्यांना सोडून मी जाणार नाही.”
14 शलमोनाने मंदिर बांधण्याचे काम पूर्ण केले.
15 मंदिराच्या दगडी भिंतींना जमिनीपासून छतापर्यंत गंधसरुच्या लाकडाचे आतून आच्छादन होते. दगडी जमीन देवदारुच्या लाकडाने मढवलेली होती.
16 मंदिराच्या आत मागच्या बाजूला वीस हात लांबीचा परमपवित्र गाभारा होता. त्याच्याही भिंती खालपासून वरपर्यंत गंधसरुचा लाकडाने मढवलेल्या होत्या.
17 मंदिराचा मुख्य दर्शनीभाग या पवित्र गाभाऱ्यासमोर होता. त्याची लांबी चाळीस हात होती.
18 हा भाग सुध्दा गंधसरुने मढवलेला होता. त्यातून भिंतीच्या दगडाचे काहीच दर्शन होत नव्हते. या लाकडावर उमललेली फुले आणि रानकाकड्या यांचे कोरीव काम केलेले होते.
1 राजे 6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी