Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 94:9-22 in Marathi

Help us?

स्तोत्र. 94:9-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 ज्याने आपला कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने आपला डोळा बनविला तो पाहणार नाही काय?
10 जो राष्ट्रांना शिस्त लावतो, तो शिक्षा करणार नाही का? जो मनुष्यांना ज्ञान शिकवतो. तो अज्ञानी असणार का?
11 परमेश्वर मनुष्यांचे विचार जाणतो, ते भ्रष्ट आहेत.
12 हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
13 दुष्टासाठी खाच खणली जाईपर्यंत, तू त्यास संकटसमयी विसावा देशील.
14 कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
15 कारण न्याय नितीमानाकडे वळेल; आणि सरळ मनाचे सर्व तो अनुसरतील.
16 माझ्यासाठी दुष्कर्म करणाऱ्याविरूद्ध कोण लढेल? अन्याय करणाऱ्याविरूद्ध माझ्यासाठी कोण उभा राहिल?
17 जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
18 जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
19 जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
20 जे दुष्टपणाचे राजासन कायद्याने अरिष्ट योजते ते तुझ्याशी संबंध ठेवाल काय?
21 ते नितीमानाच्या जिवाविरूद्ध एकवट होतात, आणि निर्दोष्यांस देहांत शिक्षा देतात;
22 परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
स्तोत्र. 94 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी