Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 92:5-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 92:5-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.
6 पशुतुल्य मनुष्यास ते कळत नाहीत, किंवा मूर्खाला ती समजत नाहीत,
7 दुष्ट गवताप्रमाणे उगवले, आणि सर्व वाईट करणारे भरभराटीस आले; तरीही त्यांचा कायमचा शेवटचा नाश ठरलेला आहे.
8 परंतु हे परमेश्वरा, तू तर सदासर्वकाळ राज्य करशील.
9 हे परमेश्वरा, खरोखर, तुझ्या शत्रूंकडे पाहा; सर्व वाईट करणारे विखरले आहेत.
10 पण तू माझे शिंग रानबैलाच्या शिंगाप्रमाणे उंच केले आहेस; मला ताज्या तेलाचा अभिषेक झाला आहे.
11 माझ्या डोळ्यांनी माझ्या शत्रूंचा नाश पाहिला आहे; जे दुष्कर्मी माझ्यावर उठतात त्यांच्याविषयी माझ्या कानांनी ऐकले आहे.
12 नितीमान खजुरीसारखा समृद्ध होईल, तो लबानोनावरील गंधसरूसारखा वाढेल.
13 जे परमेश्वराच्या घरात लावलेल्या वृक्षासारखे आहेत; ते आपल्या देवाच्या अंगणात झपाट्याने वाढतील.
14 वृद्धपणातही ते फळ देत राहतील; ते टवटवीत आणि हिरवे राहतील.
स्तोत्र. 92 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी