Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 91:4-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 91:4-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तो तुला आपल्या पंखानी झाकील, आणि तुला त्याच्या पंखाखाली आश्रय मिळेल. त्याचे सत्य ढाल व कवच आहे.
5 रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,
6 किंवा अंधारात फिरणाऱ्या मरीला किंवा भर दुपारी नाश करणाऱ्या पटकीला तू भिणार नाहीस.
7 तुझ्या एका बाजूला हजार पडले, आणि तुमच्या उजव्या हातास दहा हजार पडले, पण तरी ती तुझ्याजवळ येणार नाही.
8 तू मात्र निरीक्षण करशील, आणि दुष्टांना झालेली शिक्षा पाहशील.
9 कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्परालासुद्धा आपले आश्रयस्थान केले आहेस.
10 तुमच्यावर वाईट मात करणार नाही. तुमच्या घराजवळ कोणतीही पिडा येणार नाही.
11 कारण तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल.
12 ते तुला आपल्या हातांनी उचलून धरतील अशासाठी की, तू घसरून दगडावर पडू नये.
13 तू आपल्या पायाखाली सिंह आणि नागाला चिरडून टाकशील; तू सिंह व अजगर ह्याला तुडवीत चालशील.
स्तोत्र. 91 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी