Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 90:1-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 90:1-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मोशेचे स्तोत्र हे प्रभू, तू सर्व पिढ्यानपिढ्या आमचे निवासस्थान आहेस.
2 पर्वत अस्तित्वात येण्यापूर्वी किंवा पृथ्वी व जग निर्माण होण्याआधीच, अनादिकाळापासून ते अनंतकाळापर्यंत तूच देव आहेस.
3 तू मनुष्यास पुन्हा मातीस मिळवतोस, आणि तू म्हणतोस, “अहो मनुष्याच्या वंशजांनो परत या.”
4 कारण हजारो वर्षे तुझ्या दृष्टीने, कालच्या गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
5 पुराप्रमाणे तू त्यांना झाडून दूर नेतोस आणि ते निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, सकाळी उगवणाऱ्या गवतासारखे ते आहेत.
6 सकाळी ते उगवते आणि वाढते; संध्याकाळी ते निस्तेज होते व वाळून जाते.
7 खरोखर, आम्ही तुझ्या रागाने नष्ट होतो, आणि तुझ्या कोपाने आम्ही घाबरून जातो.
स्तोत्र. 90 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी