31 जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
32 मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
33 परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
34 मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
35 एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
36 त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
38 पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
39 तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
40 तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उध्वस्त केलेस.
41 सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तो आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे.
42 तू त्याच्या शत्रूंचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस.
43 तू त्यांच्या तलवारीची धार बोथट केली आहे. आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस.
44 तू त्याच्या तेजस्वितेचा शेवट केला; तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस.
45 तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस.
46 हे परमेश्वरा, किती वेळ? तू आपल्या स्वतःला सर्वकाळ लपविणार काय? तुझा राग अग्नीसारखा किती वेळ जळेल?
47 माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर, तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय?
48 कोण जिवंत राहिल आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवील?
49 हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दावीदाशी शपथ वाहिली, ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत?