Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 89:19-39 in Marathi

Help us?

स्तोत्र. 89:19-39 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्यांशी दृष्टांतात बोललास; तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे.
20 मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे; मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे.
21 माझा हात त्यास आधार देईल; माझा बाहू त्यास बलवान करील.
22 कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास छळणार नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना त्याच्यापुढे चिरडून टाकीन; जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकीन.
24 माझे सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्याबरोबर राहील; माझ्या नावाने ते विजयी होतील.
25 मी त्याचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यांवर ठेवीन.
26 तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस.
27 आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन, पृथ्वीवरील राजांत त्यास परमश्रेष्ठ करीन.
28 मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्वकाळ विस्तारील, आणि त्यांच्याबरोबरचा माझा करार सर्वकाळ टिकेल.
29 त्याचे वंश सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन आकाशाप्रमाणे टिकेल.
30 जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला.
31 जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.
32 मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने, आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन.
33 परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही; मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन.
34 मी माझा करार मोडणार नाही, किंवा माझ्या ओठांचे शब्द बदलणार नाही.
35 एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे, आणि मी दावीदाशी खोटे बोलणार नाही.
36 त्याची संतती सर्वकाळ राहील, आणि त्याचे राजासन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सर्वकाळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत.
38 पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागावलास, तू त्याचा त्याग केला, आणि नाकारलेस.
39 तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास.
स्तोत्र. 89 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी