Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 88:2-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 88:2-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझी प्रार्थना ऐक; माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
3 कारण माझा जीव क्लेशांनी भरला आहे, आणि माझे जीवन मृतलोकाजवळ आले आहे.
4 खाचेत खाली जातात त्यांच्यासारखे लोक माझ्याशी वागत आहेत; मी असहाय्य मनुष्यासारखा आहे.
5 मला मृतामध्ये सोडून दिले आहे; अशा मृतासारखा जो कबरेत पडून राहतो, ज्याची तू आणखी दखल घेत नाहीस, ज्याला तुझ्या सामर्थ्यापासून कापून टाकले आहेत, त्यांच्यासारखा मी झालो आहे.
6 तू मला त्या खड्‌यांतल्या खालच्या भागात, काळोखात व अगदी खोल जागी टाकले आहेस.
7 तुझ्या क्रोधाचे खूप ओझे माझ्यावर पडले आहे, आणि तुझ्या सर्व लाटा माझ्यावर जोराने आपटत आहेत.
8 तुझ्यामुळे माझ्या ओळखीचे मला टाळतात. त्यांच्या दृष्टीने माझा त्यांना वीट येईल असे तू केले आहे; मी आत कोंडलेला आहे आणि मी निसटू शकत नाही.
9 कष्टामुळे माझे डोळे थकून जात आहेत; हे परमेश्वरा, मी दिवसभर तुला आरोळी मारित आहे. मी आपले हात तुझ्यापुढे पसरत आहे.
10 तू मृतांसाठी चमत्कार करशील काय? जे मरण पावलेले आहेत ते उठून तुझी स्तुती करतील काय?
11 तुझ्या दयेची व प्रामाणिकपणाची कबरेत किंवा मृतांच्या जागी घोषणा होईल का?
स्तोत्र. 88 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी