Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 86:8-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 86:8-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
9 हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.
10 कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; तूच फक्त देव आहेस.
11 हे परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव, मग मी तुझ्या सत्यात चालेन. तुझ्या नावाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.
12 हे प्रभू, माझ्या देवा, मी अगदी आपल्या मनापासून तुझी स्तुती करीन; मी सर्वकाळ तुझ्या नावाचे गौरव करीन.
13 कारण माझ्यावर तुझी महान दया आहे; तू माझा जीव मृत्यूलोकापासून सोडवला आहेस.
14 हे देवा, उद्धट लोक माझ्याविरूद्ध उठले आहेत. हिंसाचारी लोकांची टोळी माझा जीव घेण्यास पाहत आहे. त्यांना तुझ्यासाठी काही आदर नाही.
स्तोत्र. 86 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी