Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 86:6-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 86:6-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला कान दे; माझ्या काकुळतीच्या वाणीकडे लक्ष दे.
7 हे परमेश्वरा, मी आपल्या संकटाच्या दिवसात तुला हाक मारीन, कारण तू मला उत्तर देशील.
8 हे प्रभू, देवांमध्ये तुझ्याशी तुलना करता येईल असा कोणीही नाही. तुझ्या कृत्यासारखी कोणीतीही कृत्ये नाहीत.
9 हे प्रभू, तू निर्माण केलेली सर्व राष्ट्रे येतील आणि तुझ्यापुढे नमन करतील. ते तुझ्या नावाला आदर देतील.
10 कारण तू महान आहेस व तू आश्चर्यकारक गोष्टी करतोस; तूच फक्त देव आहेस.
स्तोत्र. 86 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी