Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 85:1-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 85:1-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 कोरहाच्या मुलांची स्तोत्रे हे परमेश्वरा, तू आपल्या देशावर अनुग्रह दाखवला आहेस; तू याकोबाला बंदिवासातून परत आणले आहेस.
2 तू आपल्या लोकांच्या पापांची क्षमा केली आहेस. तू त्यांची सर्व पापे झाकून टाकली आहेत.
3 तू आपला सर्व क्रोध काढून घेतला आहे; आणि आमच्यावरील भयंकर क्रोधापासून मागे फिरला आहेस.
4 हे आमच्या तारणाऱ्या देवा, आम्हास परत आण, आणि आमच्यावरचा तुझा असंतोष दूर कर.
5 सर्वकाळपर्यंत तू आमच्यावर रागावलेला राहशील का? पिढ्यानपिढ्या तू रागावलेला राहशील काय?
6 तुझ्या लोकांनी तुझ्याठायी आनंद करावा, म्हणून तू आम्हास परत जिवंत करणार नाहीस का?
स्तोत्र. 85 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी