Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 80:4-13 in Marathi

Help us?

स्तोत्र. 80:4-13 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 हे परमेश्वरा, सेनाधीश देवा, तुझे लोक प्रार्थना करीत असता तू किती वेळ कोपलेला राहशील?
5 तू त्यांना अश्रूंची भाकर खावयास दिली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आसवे पिण्यास दिली आहेत.
6 तू आम्हास आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त करतोस, आणि आमचे शत्रू आपसात आम्हास हसतात.
7 हे सेनाधीश देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर. आपला मुखप्रकाश आम्हावर पाड आणि आम्हास वाचव.
8 मिसर देशातून तू द्राक्षवेल काढून आणिला; राष्ट्रांना घालवून देऊन तो त्यांच्या भूमीत लाविला.
9 तू त्याकरता जागा तयार केली; त्याने मूळ धरले आणि देश भरून टाकला.
10 त्याच्या सावलीने पर्वत, त्याच्या फांद्यांनी देवाचे उच्च गंधसरू आच्छादून टाकले.
11 त्याने आपल्या फांद्या समुद्रापर्यंत आणि आपले कोंब फरात नदीपर्यंत पाठविले.
12 तू त्यांची कुंपणे कां मोडली? त्यामुळे वाटेने येणारे जाणारे सगळे त्याचे फळ तोडतात.
13 रानडुकरे येऊन त्याची नासधूस करतात. आणि रानटी पशू त्यास खाऊन टाकतात.
स्तोत्र. 80 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी