Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 78:60-72 in Marathi

Help us?

स्तोत्र. 78:60-72 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

60 त्याने शिलोतले पवित्रस्थान सोडून दिले, ज्या तंबूत लोकांच्यामध्ये तो राहत होता.
61 त्याने आपल्या सामर्थ्याचा कोश बंदिवासात जाण्याची परवानगी दिली, आणि आपले गौरव शत्रूच्या हातात दिले.
62 त्याने आपले लोक तलवारीच्या स्वाधीन केले, आणि आपल्या वतनावर तो रागावला.
63 अग्नीने त्यांच्या तरुण मनुष्यास खाऊन टाकले, आणि त्यांच्या तरुण स्रीयांना लग्नगीते लाभली नाहीत.
64 त्यांचे याजक तलवारीने पडले, आणि त्यांच्या विधवा त्यांच्यासाठी रडल्या नाहीत.
65 मग प्रभू झोपेतून जागा झालेल्या मनुष्यासारखा उठला, द्राक्षरसामुळे आरोळी मारणाऱ्या सैनिकासारखा तो उठला.
66 त्याने आपल्या शत्रूंना मारून मागे हाकलले; त्याने त्यांची कायमची नामुष्की केली.
67 त्याने योसेफाचा तंबू नाकारला, आणि त्याने एफ्राईमाच्या वंशाचा स्वीकार केला नाही.
68 त्याने यहूदाच्या वंशाला निवडले, आणि आपला आवडता सियोन पर्वत निवडला.
69 उंच आकाशासारखे व आपण सर्वकाळ स्थापिलेल्या पृथ्वीसारखे त्याने आपले पवित्रस्थान बांधले.
70 त्याने आपला सेवक दावीदाला निवडले, आणि त्यास त्याने मेंढरांच्या कोंडवाड्यांतून घेतले.
71 आपले लोक याकोब व आपले वतन इस्राएल यांचे पालन करण्यास त्याने त्यास दुभत्या मेंढ्याच्या मागून काढून आणले.
72 दावीदाने आपल्या मनाच्या सरळतेने त्याचे पालन केले, आणि आपल्या हातच्या कौशल्याने त्यास मार्ग दाखविला.
स्तोत्र. 78 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी