Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 75:1-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 75:1-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात.
2 नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन.
3 जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन.
4 मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका.
5 विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका.
6 विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही.
7 पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो.
स्तोत्र. 75 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी