Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 72:3-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 72:3-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पर्वत लोकांसाठी शांती उत्पन्न करतील; टेकड्या न्यायीपणा उत्पन्न करतील.
4 तो लोकांतील गरीबांचा न्याय करील; गरजवंताच्या मुलांना तारील, आणि जुलूम करणाऱ्यांचे तुकडे करील.
5 जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत सर्व पिढ्यानपिढ्या ते तुझा आदर करतील.
6 जसा कापलेल्या गवतावर पाऊस पडतो, तशी पृथ्वीला भिजवणारी पावसाची सर उतरून येईल.
7 त्याच्या दिवसात नितिमानाची भरभराट होवो, आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती होईल.
8 समुद्रापासून समुद्रापर्यंत आणि त्या नदीपासून ते पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याची सत्ता राहो.
9 अरण्यात राहणारे त्याच्यासमोर नमन करोत; त्याचे शत्रू धूळ चाटोत.
10 तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
स्तोत्र. 72 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी