Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 72:10-16 in Marathi

Help us?

स्तोत्र. 72:10-16 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तार्शीश आणि बेटांचे राजे खंडणी देवोत; शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणोत.
11 खरोखर, सर्व राजे त्याच्यापुढे नमन करोत; सर्व राष्ट्रे त्याची सेवा करोत;
12 कारण त्याने धावा करणाऱ्या गरजवंताला, आणि गरीबाला दुसरा कोणी मदतनीस नाही त्यास मदत केली आहे.
13 तो गरीब आणि गरजवंतांवर दया करील, आणि गरजवंताचा जीव तो तारील.
14 तो त्यांचा जुलूम आणि हिंसाचारापासून त्यांचा जीव खंडून घेईल, आणि त्यांचे रक्त त्याच्या दृष्टीने मौलवान आहे.
15 राजा जगेल, त्यास शबाचे सोने दिले जावो. लोक त्याच्यासाठी नेहमी प्रार्थना करो; देव त्यास दिवसभर आशीर्वाद देवो.
16 तेथे पृथ्वीत पर्वत कळसावर विपुल धान्य येवो; तिचे पीक लबानोन झाडासारखे वाऱ्याच्या झुळकेने डुलोत आणि नगरातले लोक पृथ्वीच्या गवतासारखी भरभराटीस येवो.
स्तोत्र. 72 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी