Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 68:16-28 in Marathi

Help us?

स्तोत्र. 68:16-28 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 देवाला आपल्या निवासासाठी जो पर्वत आवडला आहे, त्याच्याकडे हे अनेक शिखरांच्या पर्वता, तू हेव्याने का पाहतोस? खरोखर, परमेश्वर त्याच्यावरच सर्वकाळ राहील.
17 देवाचे रथ वीस हजार आहेत, हजारो हजार आहेत. जसा सीनाय पर्वतावर पवित्रस्थान, तसा प्रभू त्यांच्यामध्ये आहे.
18 तू उंचावर चढलास; तू बंदिवानास दूर नेले आहे; मनुष्याकडून आणि जे तुझ्याविरूद्ध लढले त्यांच्यापासूनही भेटी स्वीकारल्या आहेत, यासाठी की, हे परमेश्वर देवा, तू तेथे रहावे.
19 प्रभू धन्यवादित असो, तो दररोज आमचा भार वाहतो, देव आमचे तारण आहे.
20 आमचा देव आम्हास तारणारा देव आहे; मृत्यूपासून सोडविणारा प्रभू परमेश्वर आहे.
21 पण देव आपल्या शत्रूचे डोके आपटेल, जो आपल्या अपराधात चालत जातो त्याचे केसाळ माथे आपटेल.
22 परमेश्वर म्हणाला, मी माझ्या लोकांस बाशानापासून परत आणीन, समुद्राच्या खोल स्थानातून त्यांना परत आणीन.
23 यासाठी की, तू आपल्या शत्रूला चिरडावे, आपला पाय त्यांच्या रक्तात बुडवा, आणि तुझ्या शत्रुंकडून तुझ्या कुत्र्यांच्या जिभेस वाटा मिळावा.
24 हे देवा, त्यांनी तुझ्या मिरवणुका पाहिल्या आहेत, पवित्रस्थानी माझ्या देवाच्या, माझ्या राजाच्या मिरवणुका त्यांनी पाहिल्या आहेत.
25 गायकपुढे गेले, वाजवणारे मागे चालले आहेत, आणि मध्ये कुमारी कन्या लहान डफ वाजवत चालल्या आहेत.
26 मंडळीत देवाचा धन्यवाद करा; जे तुम्ही इस्राएलाचे खरे वंशज आहात ते तुम्ही परमेश्वराची स्तुती करा.
27 तेथे त्यांचा अधिकारी प्रथम बन्यामीन, कनिष्ठ कुळ, यहूदाचे अधिपती, व त्याच्याबरोबरचे समुदाय जबुलूनाचे अधिपती, नफतालीचे अधिपती हे आहेत.
28 तुझ्या देवाने, तुझे सामर्थ्य निर्माण केले आहे; हे देवा, तू पूर्वीच्या काळी आपले सामर्थ्य दाखविले तसे आम्हास दाखव.
स्तोत्र. 68 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी