Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 60:7-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 60:7-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8 मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
10 हे देवा, तू आम्हास नाकारले नाही? परंतु तू आमच्या सैन्याबरोबर लढाईत गेला नाहीस.
11 तू आमच्या शत्रूविरूद्ध आम्हास मदत कर, कारण मनुष्याचे सहाय्य निष्फळ आहे.
12 आम्ही देवाच्या मदतीने विजयी होऊ; तो आमच्या शत्रूला आपल्या पायाखाली तुडविल.
स्तोत्र. 60 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी