Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 60:4-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 60:4-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुझा आदर करणाऱ्यास तू निशाण दिले आहे, यासाठी की, त्यांनी सत्याकरता तो उभारावा.
5 ज्यांच्यावर तू प्रेम करतो त्यांची सुटका व्हावी, म्हणून तुझ्या उजव्या हाताने आमची सुटका कर आणि आम्हास उत्तर दे.
6 देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी जल्लोष करीन; मी शखेमाची वाटणी करीन आणि सुक्कोथाचे खोरे मोजून देईन.
7 गिलाद माझा आहे आणि मनश्शे माझा आहे; एफ्राईमही माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझा राजदंड आहे.
8 मवाब माझे धुण्याचे पात्र आहे; अदोमावर मी माझे पादत्राण फेकीन; मी आनंदाने पलिष्ट्यावर विजयाने आरोळी मारीन.
9 मला बळकट नगरात कोण नेईल? मला अदोमात कोण नेईल?
स्तोत्र. 60 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी