Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 55:4-11 in Marathi

Help us?

स्तोत्र. 55:4-11 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 माझे हृदय फार दुखणाईत आहे, आणि मृत्यूचे भय माझ्यावर येऊन पडले आहे.
5 भय आणि थरथरने माझ्यावर आली आहेत, आणि भयाने मला ग्रासले आहे.
6 मला कबूतरासारखे पंख असते तर किती बरे झाले असते. मी दूर उडून गेलो असतो आणि स्वस्थ राहिलो असतो.
7 मी खूप दूर भटकत गेलो असतो. मी रानात राहिलो असतो.
8 वादळी वाऱ्यापासून मला आश्रय मिळावा म्हणून मी लवकर पळालो असतो.
9 प्रभू, त्यांना नाश कर, आणि त्यांच्या भाषेत गोंधळ निर्माण कर. कारण मी शहरात हिंसा आणि भांडणे पाहिली आहेत.
10 दिवस रात्र ते भींतीवर चढून जातात; अपराध आणि अनर्थ तिच्यामध्ये आहेत.
11 दुष्टपणा तिच्यामध्ये कार्य करत आहे, जुलूम आणि कपट कधीही तिच्या रस्त्यांना सोडत नाही.
स्तोत्र. 55 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी