Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 52:1-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 52:1-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दाविदाचे स्तोत्र हे सामर्थ्यवान पुरुषा, तू वाईट गोष्टींचा अभिमान का बाळगतोस? देवाच्या कराराची विश्वसनियता प्रत्येक दिवशी येते.
2 अरे कपटाने कार्य करणाऱ्या, तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी नाशाची योजना करते.
3 तुला चांगल्यापेक्षा वाईटाची, आणि प्रामाणिकपणे बोलण्यापेक्षा असत्याची अधिक आवड आहे.
4 तू कपटी जीभे, तुला दुसऱ्यांचा नाश करणारे शब्द आवडतात.
5 त्याप्रमाणे देव तुझा सर्वकाळ नाश करील; तो तुला वर घेऊन जाईल आणि आपल्या तंबूतून उपटून बाहेर काढेल आणि तुला जिवंताच्या भूमीतून मुळासकट उपटून टाकील.
6 नितीमानसुद्धा ते पाहतील आणि घाबरतील; ते त्याच्याकडे पाहून हसतील आणि म्हणतील,
7 पाहा, या मनुष्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, पण आपल्या विपुल संपत्तीवर भरवसा ठेवला, आणि आपल्या दुष्टपणात स्वतःला पक्के केले.
8 पण मी तर देवाच्या घरात हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे; माझा देवाच्या कराराच्या विश्वसनीयतेवर सदासर्वकाळ आणि कायम भरवसा आहे.
9 कारण ज्या गोष्टी तू केल्या आहेत, त्यासाठी मी तुझ्या विश्वासणाऱ्यांच्या समक्षेत सर्वकाळ तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावात आशा ठेवली आहे कारण ते चांगले आहे.
स्तोत्र. 52 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी