Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 51:8-19 in Marathi

Help us?

स्तोत्र. 51:8-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
10 देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
11 तुझ्या उपस्थितीतून मला दूर लोटू नकोस, आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.
12 तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.
13 तेव्हा मी पापी लोकांस तुझे मार्ग शिकविन आणि पापी तुझ्याकडे परिवर्तित होतील.
14 हे माझ्या तारणाऱ्या देवा, रक्तपाताच्या दोषापासून मला क्षमा कर, आणि मी तुझ्या न्यायीपणाबद्दल मोठ्याने ओरडेन.
15 प्रभू, माझे ओठ उघड, आणि माझे तोंड तुझी स्तुती वर्णन करेल.
16 कारण यज्ञाची आवड तुला नाही, नाहीतर मी ते दिले असते, होमार्पणाने तुला संतोष होत नाही.
17 देवाचा यज्ञ म्हणजे, तुटलेले हृदय, तुटलेले आणि पश्चातापी हृदय तू तुच्छ मानणार नाहीस.
18 हे देवा, तू प्रसन्न होऊन सियोनेचे चांगले कर. आणि यरूशलेमेच्या भींती पुन्हा बांध.
19 तेव्हा न्यायीपणाचे यज्ञ, होमार्पणे, आणि सकल होमार्पणे तुला आवडतील. तेव्हा तुझ्या वेदीवर बैल अर्पिले जातील.
स्तोत्र. 51 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी