Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 51:4-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 51:4-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तुझ्याविरूद्ध, फक्त तुझ्याविरूद्ध मी पाप केले आहे, आणि तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. जेव्हा तू बोलतोस तर तू सत्य बोलतो. तू न्याय करतो तेव्हा योग्य करतो.
5 पाहा! मी जन्मापासूनच पापी आहे, आणि पापांतच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला.
6 पाहा! तू माझ्या हृदयात सत्यतेची इच्छा धरतो, तू माझ्या हृदयास ज्ञानाची ओळख करून दे.
7 मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर, मी शुद्ध होईन, मला धुऊन शुद्ध कर आणि मी बर्फापेक्षा शुद्ध होईन.
8 आनंद व हर्ष मला ऐकू दे, म्हणजे तू मोडलेली माझी हाडे हर्ष करतील.
9 माझ्या पापांकडे बघू नकोस, माझ्या सर्व अपराधांचे डाग पुसून टाक.
10 देवा, माझ्याठायी पवित्र हृदय निर्माण कर. आणि माझ्या मध्ये स्थीर असा आत्मा पुन्हा घाल.
स्तोत्र. 51 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी