Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 50:18-23 in Marathi

Help us?

स्तोत्र. 50:18-23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 तुम्ही चोराला बघता आणि त्याच्याबरोबर सहमत होता. तुम्ही व्यभिचार करणाऱ्या लोकांबरोबर सहभागी होता.
19 तू वाईटाला आपले मुख देतोस, आणि तुझी जीभ कपट व्यक्त करते.
20 तुम्ही बसता आणि आपल्या भावाविरूद्ध बोलता. तू आपल्या सख्या भावाची निंदा करतोस.
21 तुम्ही वाईट गोष्टी करता आणि तरीही मी गप्प राहिलो. मी तुझ्यासारखा आहे असे तुला वाटले, परंतू मी तुझा निषेध करणार आणि तुझ्या डोळ्यापुढे ओळीने सर्वकाही मांडणार.
22 तुम्ही लोक देवाला विसरला आहात. मी तुम्हास फाडून टाकण्यापूर्वीच तुम्ही हे सारे लक्षात घ्या जर तसे घडले तर तुम्हास कोणीही वाचवू शकणार नाही.
23 जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ अर्पितो, आणि जो कोणी आपला मार्ग सरळ योजितो, त्यास मी देवाचे तारण दाखवेन.
स्तोत्र. 50 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी