Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 47:2-9 in Marathi

Help us?

स्तोत्र. 47:2-9 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 कारण परात्पर परमेश्वर भय धरण्यास योग्य आहे; तो सर्व पृथ्वीवर थोर राजा आहे.
3 तो लोकांस आमच्या ताब्यात देतो, आणि राष्ट्रांना आमच्या पायाखाली आणतो.
4 त्याने आमचे वतन आमच्यासाठी निवडले आहे, ज्या याकोबावर त्याने प्रीती केली तो त्याचे वैभव आहे.
5 जयघोष होत असता देव वर गेला, परमेश्वर तुतारीच्या आवाजात वर गेला.
6 देवाला स्तुतिगान गा, स्तुतिस्तवने गा; आमच्या राजाची स्तुतिगीते गा, स्तुतिगीते गा.
7 कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे; त्याची स्तुतीपर गाणे उमजून गा.
8 देव राष्ट्रांवर राज्य करतो; देव आपल्या पवित्र सिंहासनावर बसला आहे.
9 अब्राहामाच्या देवाच्या लोकांचे अधिपती एकत्र जमले आहेत; कारण पृथ्वीवरील ढाली देवाच्या आहेत. तो अत्यंत उंच आहे.
स्तोत्र. 47 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी