Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 45:4-15 in Marathi

Help us?

स्तोत्र. 45:4-15 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तू आपल्या सत्याने, नम्रतेने, न्यायीपणामध्ये विजयाने स्वारी कर, तुझा उजवा हात तुला भयानक गोष्टी शिकवेल.
5 तुझे बाण तीक्ष्ण आहेत. लोक तुझ्या पायाखाली पडतील. तुझे बाण राजाच्या शत्रूंच्या हृदयात आहेत.
6 देवा तुझे सिंहासन सर्वकाळासाठी आहे. तुझा न्यायाचा राजदंड हा तुझ्या राज्याचा राजदंड आहे.
7 तू न्यायीपणावर प्रीती केली आणि दुष्टाईचा हेवा केला. यास्तव देवाने, तुझ्या देवाने, हर्षाच्या तेलाने तुला तुझ्या सोबत्यांपेक्षा अधीक अभिषेक केल आहे.
8 तुझ्या वस्त्रांना बोळ, अगरू, ऊद आणि दालचिनी यांचा सुगंध येतो. हस्तिदंताच्या महालातून तंतुवाद्यांनी तुला आनंदीत केले आहे.
9 राजांच्या मुली तुझ्या सन्मान्य स्रीयांच्यामध्ये आहेत. राणी ओफिराच्या सोन्याने शृंगारलेली तुझ्या उजव्या बाजूस उभी आहे.
10 मुली, लक्षपूर्वक ऐक, विचार कर, आपला कान लाव. तुझी माणसे आणि तुझ्या वडीलांच्या घराला विसरून जा.
11 अशाने राजा तुझ्या सौंदर्याची आवड धरणार, तो तुझा स्वामी आहे, तू त्याचा आदर कर.
12 सोराची कन्या तुझ्यासाठी भेट आणील. श्रीमंतातील लोक तुला भेटायची इच्छा धरतील.
13 राजकन्या राजमहालात तेजस्वी आहे, तिचे वस्र सोन्याच्या कारागिरीचे आहेत.
14 तिला कशिदाकाम केलेल्या वस्त्रांमध्ये राजाकडे नेले जाईल. तिच्या मागे चालणाऱ्या तिच्या सोबतिणी कुमारी तुझ्याजवळ आणल्या जातील.
15 ते आनंदात व हर्षात नेल्या जातील. ते राजाच्या महालात प्रवेश करतील.
स्तोत्र. 45 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी