23 प्रभू, ऊठ तू का झोपला आहेस? ऊठ, आम्हास कायमचा सोडून जाऊ नकोस.
24 तू आमच्यापासून आपले मुख का लपवतोस? आणि आमचे दु:ख आणि आमच्यावरचे जुलूम तू का विसरतोस?
25 कारण आमचा जीव धुळीस खालपर्यंत गेला आहे, आणि आमचे पोट भूमीला चिकटले आहे.
26 आमच्या साहाय्याला ऊठ! आणि तुझ्या प्रेमदयेस्तव आम्हास वाचव.