Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 40:4-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 40:4-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 जो पुरुष परमेश्वरास आपला विश्वास करतो, आणि गर्विष्ठांना किंवा जे खोट्यासाठी त्याच्याकडून फिरले आहेत त्यांना मानत नाही, ते आशीर्वादित आहेत.
5 परमेश्वरा, माझ्या देवा, तू केलेली आश्चर्याची कृत्ये पुष्कळ आहेत. आणि आमच्यासाठी तुझे विचार मोजले जाणार नाहीत इतके आहेत. जर मी त्यांच्याबद्दल बोलायचे म्हटले तर, ते मोजण्यापलीकडचे आहेत.
6 यज्ञ आणि अन्नार्पण यांमध्ये तुला आनंद नाही. परंतु तू माझे कान उघडले आहेत. होमार्पणे किंवा पापार्पणे तू मागत नाहीस.
7 म्हणून मी म्हणालो बघ, मी आलो आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले आहे.
8 माझ्या देवा, तुझी इच्छा पूर्ण करण्यात मला आनंद आहे.
9 मोठ्या सभेत मी न्यायीपणाचे शुभवर्तमान घोषित केले. परमेश्वरा, तुला माहित आहे.
10 तुझे न्यायीपण मी आपल्या हृदयात लपवून ठेवले नाही. तुझा विश्वासूपणा आणि तुझे तारण मी घोषित केले. तुझी प्रेमदया किंवा सत्य मी मोठ्या सभेत लपवून ठेवले नाही.
स्तोत्र. 40 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी