8 माझ्या अपराधांवर मला विजय दे, मला मूर्खांच्या अपमानाची वस्तू होऊ देऊ नको.
9 मी मुका राहिलो, मी आपले तोंड उघडले नाही. कारण हे तुच केले आहेस.
10 मला जखमा करणे थांबव, तुझ्या हाताच्या माराने मी क्षीण झालो आहे.
11 जेव्हा तू लोकांस पापांबद्दल शिकवण करतोस. कसरीप्रमाणे तू त्यांची शक्ती खाऊन टाकतो. खचित सर्व मनुष्य फक्त वाफ आहेत. (सेला)