Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 37:5-20 in Marathi

Help us?

स्तोत्र. 37:5-20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6 तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7 परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
9 कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील, परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10 थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील; तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11 परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील, आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12 दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो, आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13 प्रभू त्यास हसत आहे, कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
14 जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत, त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
16 अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा, नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
17 कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
18 परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो, आणि त्यांचे वतन सदैव राहील.
19 वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
20 परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
स्तोत्र. 37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी