Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 37:3-8 in Marathi

Help us?

स्तोत्र. 37:3-8 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर; देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
4 परमेश्वरामध्ये आनंद कर, आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
5 तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6 तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7 परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा. जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो, तर काळजी करू नको.
8 रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस. त्याने फक्त त्रास होतो.
स्तोत्र. 37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी