Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 37:27-36 in Marathi

Help us?

स्तोत्र. 37:27-36 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 वाईटापासून फिर आणि चांगले ते कर. तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
28 कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही. ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत. परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
29 नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
30 नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते, आणि न्याय वाढवते.
31 त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते, त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
32 परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो, आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
33 परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही. किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
34 परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ. आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल. जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
35 मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला. जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
36 परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता. मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
स्तोत्र. 37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी