Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 37:19-26 in Marathi

Help us?

स्तोत्र. 37:19-26 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत. जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
20 परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील, परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील; ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
21 दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही. परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
22 जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील; आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
23 मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात, असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
24 जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही. कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
25 मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे; तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
26 सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो, त्याची संतती आशीर्वादित असते.
स्तोत्र. 37 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी