Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 35:7-14 in Marathi

Help us?

स्तोत्र. 35:7-14 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 विनाकारण त्यांनी माझ्यासाठी आपले जाळे पसरवले आहे. विनाकारण त्यांनी माझ्यासाठी खाच खणली आहे.
8 त्यांच्यावर नाश अकस्मात येऊन गाठो, त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकू दे. त्यांच्याच नाशात ते पडोत.
9 परंतु मी परमेश्वराच्या ठायी आनंदी असेन, आणि त्याच्या तारणात मी हर्ष करीन.
10 माझ्या सर्व शक्तीने मी म्हणेन, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण आहे? जो तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस. आणि गरीबांना आणि गरजवंताना त्याच्या लुटणाऱ्यांपासून सोडवतो.
11 अनितीमान साक्षी उठल्या आहेत; ते माझ्यावर खोटा आरोप लावतात.
12 माझ्या चांगल्या बद्दल ते मला वाईट परत फेड करतात. मी दु:खी आहे.
13 परंतू जेव्हा ते आजारी पडले मी तर गोणताट परीधान केले, मी त्यांच्या करता उपवास केला, मी प्रार्थना केली पण त्यांचे उत्तम मिळाले नाही.
14 मी त्याच्याकरिता शोक केला जणू काय तो माझा भाऊ आहे. मी खाली लवून विलाप केला जशी ती माझी आई आहे.
स्तोत्र. 35 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी