Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 33:6-18 in Marathi

Help us?

स्तोत्र. 33:6-18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 परमेश्वराच्या शब्दाकडून आकाशे निर्माण झाली आणि त्याच्या मुखातील श्वासाने सर्व तारे निर्माण झाले आहेत.
7 तो समुद्रातील पाणी ढीगासारखे एकत्र करतो, तो समुद्र कोठारामध्ये ठेवतो.
8 सर्व पृथ्वी परमेश्वराचे भय बाळगो, जगात राहणारा प्रत्येक त्याच्या भीतीत उभा राहो.
9 कारण तो बोलला आणि ते झाले, त्याने आज्ञा केली आणि ते आपल्या ठिकाणी स्थिर झाले.
10 राष्ट्रांचा उपदेश परमेश्वर मोडतो, तो लोकांच्या योजनांवर अधिकार करतो.
11 परंतु परमेश्वराच्या योजना सर्वकाळ राहतात, त्याच्या हृदयातील योजना पिढ्यानपिढ्या स्थिर राहतात.
12 परमेश्वर ज्या राष्ट्राचा देव आहे ते राष्ट्र आशीर्वादित आहे. ज्यांना त्याने आपल्या वतनाचे होण्यास निवडले आहे ते सुखी आहेत.
13 परमेश्वर स्वर्गातून खाली पाहतो, तो सर्व लोकांस पाहातो.
14 तो आपल्या राहण्याच्या ठिकाणाहून पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व लोकांकडे पाहतो.
15 ज्याने सर्वांची हृदये घडवली तो त्या सर्वांची कृत्ये पारखतो, तोच तो आहे.
16 पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
17 घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
18 पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
स्तोत्र. 33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी