Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 33:16-21 in Marathi

Help us?

स्तोत्र. 33:16-21 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 पुष्कळ सैन्य असल्याने राजा तारला जात नाही. वीर योद्धा त्याच्या सामर्थ्याने वाचतो असे नाही.
17 घोडा विजयासाठी व्यर्थ आहे. त्याच्या पुष्कळ बळाने तो कोणाला वाचवू शकत नाही.
18 पाहा! परमेश्वराची दृष्टी त्याचे भय बाळगणाऱ्यांवर आहे. जे त्याच्या प्रेमदयेची आशा धरतात,
19 त्यांना मरणापासून, आणि दुष्काळापासून वाचवायला त्याची दृष्टी त्यांच्यावर आहे.
20 आम्ही परमेश्वराची वाट पाहू, तो आमचे साहाय्य आणि आमची ढाल आहे.
21 त्याच्यामध्ये आमचे हृदय हर्ष पावते, कारण आम्ही त्याच्या पवित्रतेत विश्वास ठेवतो.
स्तोत्र. 33 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी