Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 27:7-12 in Marathi

Help us?

स्तोत्र. 27:7-12 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 परमेश्वरा, मी तुला आरोळी करेन तेव्हा माझा आवाज ऐक! माझ्यावर दया कर आणि मला उत्तर दे.
8 माझे हृदय तुझ्या विषयी म्हणाले, त्याचे मुख शोध, हे परमेश्वरा, मी तुझे मुख शोधीन.
9 तू आपले मुख माझ्यापासून लपवू नकोस; तुझ्या सेवकाला रागात फटकारू नकोस! तू माझा सहाय्यकर्ता होत आला आहेस; माझ्या तारण करणाऱ्या देवा, मला सोडू किंवा त्यागू नकोस.
10 जरी माझ्या आईवडीलांनी मला सोडून दिले तरी, परमेश्वर मला उचलून घेईल.
11 परमेश्वरा, तू मला तुझे मार्ग शिकव. माझ्या वैऱ्यामुळे, मला सपाट मार्गावर चालव.
12 माझा जीव शत्रूस देऊ नको, कारण खोटे साक्षी माझ्याविरूद्ध उठले आहेत, आणि ते हिंसक श्वास टाकतात.
स्तोत्र. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी