Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 27:1-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 27:1-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझा तारणारा आहे. मी कोणाचे भय बाळगू? परमेश्वरच माझ्या जीवाचा आश्रय आहे, मी कोणाची भीती बाळगू?
2 जेव्हा दुष्ट माझे मांस खायला जवळ आले, तेव्हा माझे शत्रू आणि माझे विरोधक अडखळून खाली पडले.
3 जरी सैन्याने माझ्याविरोधात तळ दिला, माझे हृदय भयभीत होणार नाही. जरी माझ्याविरूद्ध युध्द उठले, तरी सुद्धा मी निर्धास्त राहीन.
4 मी परमेश्वरास एक गोष्ट मागितली, तीच मी शोधीन, परमेश्वराची सुंदरता पाहण्यास व त्याच्या मंदिरात ध्यान करण्यास मी माझ्या आयुष्याचे सर्व दिवस घालवेन, परमेश्वराच्या घरात मी वस्ती करीन.
स्तोत्र. 27 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी