Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 25:2-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 25:2-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 माझ्या देवा, तुझ्यात माझा विश्वास आहे. मला निराश होऊ देऊ नको, माझे शत्रू माझ्यावर हर्ष न करोत.
3 तुझ्या विश्वासणाऱ्याची कधी निराशा होत नाही. परंतु जे कारण नसताना विश्वासघात करतात, ते लाजवले जातील.
4 हे परमेश्वरा तुझे मार्ग मला कळव, मला तुझे मार्ग शिकव.
5 तू आपल्या सत्यात मला मार्ग दाखव आणि मला शिकव. कारण तू माझा तारणारा देव आहेस मी रोज तुझी वाट पाहतो.
6 हे परमेश्वरा, तुझ्या दयाळू कृत्यांची आणि प्रेमदयेची आठवण कर.
7 हे परमेश्वरा, माझे तरुणपणाचे पाप आणि माझा बंडखोरपणा आठवू नको. तू आपल्या प्रेमदयेला अनुसरून आपल्या चांगुलपणामुळे माझी आठवण कर.
स्तोत्र. 25 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी