Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 23:1-5 in Marathi

Help us?

स्तोत्र. 23:1-5 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला कशाचीही उणीव भासणार नाही.
2 तो मला हिरव्या कुरणात बसवतो, तो मला संथ पाण्याजवळ नेतो.
3 तो माझा जीव ताजा-तवाना करतो, तो आपल्या नावाकरिता मला योग्य मार्गात चालवतो.
4 मी जरी अंधकाराने भरलेल्या दरीत चालत असलो तरी, मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस, तुझी आकडी आणि काठी माझे सांत्वन करतात.
5 तू माझ्या शत्रूंच्या समक्षतेत मज पुढे मेज तयार करतोस, तू माझ्या डोक्याला तेलाने अभिषिक्त केले आहे. माझा प्याला भरुन वाहत आहे.
स्तोत्र. 23 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी