Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 20:1-4 in Marathi

Help us?

स्तोत्र. 20:1-4 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मुख्य गायकासाठी, दाविदाचे स्तोत्र. परमेश्वर तुला संकटात साहाय्य करो, याकोबाच्या देवाचे नाव तुझे संरक्षण करो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हास मदत पाठवो. तो तुम्हास सियोनातून साहाय्य करो.
3 तो तुझ्या सर्व अर्पणांची आठवण ठेवो, आणि तुझे होमार्पण यज्ञ मान्य करो.
4 तो तुझ्या हृदयाच्या इच्छा मान्य करो, आणि तुझ्या सर्व योजना पूर्ण करो.
स्तोत्र. 20 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी