Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 18:24-34 in Marathi

Help us?

स्तोत्र. 18:24-34 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 माझ्या न्यायीपणाप्रमाणे परमेश्वराने पुनसंचयित केले. कारण त्याच्या डोळ्यासमोर माझे हात निर्मळ होते.
25 जो विश्वासयोग्य आहे, त्याच्याशी तू विश्वास दाखवतोस, निर्दोष मनुष्याशी तू सात्विकतेने वागतोस.
26 जे शुद्ध असतात त्यांच्याशी तू शुद्ध असतोस, परंतु जे कुटील त्यांच्याशी तू कुटीलतेने वागतोस.
27 कारण तू पीडित लोकांस वाचविले आहेस. परंतु गर्वाने उंचावलेल्या डोळ्यांना तू खाली करतोस.
28 कारण तू माझा दिवा लावशील, परमेश्वर माझा देव माझ्या अंधाराचा प्रकाश करितो.
29 कारण तुझ्या मदतीने मी फौजेविरूद्ध जाऊ शकतो, माझ्या देवाच्या योगे मी तटावरुन उडी मारून जाऊ शकतो.
30 देवाचा मार्ग परिपूर्ण आहे. परमेश्वराचे वचन शुद्ध आहे. जे त्याच्यात आश्रय घेतात, त्यांच्यासाठी तो ढाल असा आहे.
31 कारण परमेश्वराखेरीज कोण देव आहे? आमच्या देवाशिवाय कोण खडक आहे?
32 तोच देव बलाने माझी कंबर बांधतो, जो माझे मार्ग सुरक्षित ठेवतो.
33 तो माझे पाय हरिणीसारखे चपळ करतो आणि मला डोंगरावर ठेवतो!
34 तो माझ्या हाताला युद्ध करावयाला आणि माझे भुज पितळी धनुष्य वाकवायला शिकवतो.
स्तोत्र. 18 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी