Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 148:2-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 148:2-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्याच्या सर्व देवदूतांनो त्याची स्तुती करा; त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.
3 सूर्य व चंद्रहो त्याची स्तुती करा; तुम्ही सर्व चमकणाऱ्या ताऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
4 आकाशावरील आकाशांनो आणि आकाशावरील जलांनो त्याची स्तुती करा.
5 ती परमेश्वराच्या नावाची स्तुती करोत. कारण त्याने आज्ञा केली आणि त्यांची निर्मिती झाली.
6 त्याने ती सर्वकाळासाठी व कायम स्थापली; त्याने नियम ठरवून दिला तो कधीही बदलणार नाही.
7 पृथ्वीवरून परमेश्वराची स्तुती करा. तुम्ही समुद्रातील प्राण्यांनो आणि सर्व महासागरांनो,
8 अग्नी आणि गारा, बर्फ आणि धुके, त्याचे वचन पूर्ण करणारे सर्व वादळी वारा,
9 पर्वत आणि सर्व टेकड्या, फळझाडे व सर्व गंधसरू,
10 जंगली आणि पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी आणि उडणारे पक्षी,
स्तोत्र. 148 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी