Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 147:10-19 in Marathi

Help us?

स्तोत्र. 147:10-19 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 घोड्याच्या बलाने त्यास आनंद मिळत नाही; मनुष्याच्या शक्तीमान पायांत तो आनंद मानत नाही.
11 जे परमेश्वराचा आदर करतात, जे त्याच्या दयेची आशा धरतात त्यांच्याबरोबर तो आनंदित होतो.
12 हे यरूशलेमे, परमेश्वराची स्तुती कर; हे सियोने तू आपल्या देवाची स्तुती कर.
13 कारण त्याने तुझ्या वेशींचे अडसर बळकट केले आहेत; त्याने तुझ्यामध्ये तुझी लेकरे आशीर्वादित केली आहेत.
14 तो तुझ्या सीमांच्या आत भरभराट आणतो; तो तुला उत्कृष्ट गव्हाने तृप्त करतो.
15 तो आपली आज्ञा पृथ्वीवर पाठवतो; त्याचा शब्द फार वेगाने धावतो.
16 तो लोकरीसारखे बर्फ पसरतो; तो राखेसारखे दवाचे कण विखरतो.
17 तो आपल्या गारांचा बर्फाच्या चुऱ्याप्रमाणे वर्षाव करतो; त्याने पाठवलेल्या गारठ्यापुढे कोण टिकेल?
18 तो आपली आज्ञा पाठवून त्यांना वितळवितो; तो आपला वारा वाहवितो व पाणी वाहू लागते.
19 त्याने याकोबाला आपले वचन, इस्राएलाला आपले नियम व निर्णय सांगितले.
स्तोत्र. 147 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी