Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 139:1-10 in Marathi

Help us?

स्तोत्र. 139:1-10 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दाविदाचे स्तोत्र हे परमेश्वरा, तू माझी परीक्षा केली आहेस, आणि तू मला जाणतोस;
2 मी केव्हा बसतो आणि केव्हा उठतो ते तुला माहित आहे; तुला माझे विचार खूप दुरुनही समजतात.
3 तू माझे चालने आणि माझे झोपणे बारकाईने पाहतो; तू माझ्या मार्गांशी परिचित आहेस.
4 हे परमेश्वरा, माझ्या मुखातून निघणारा एकही शब्द तुला पूर्णपणे माहित नाही असे मुळीच नाही.
5 तू मागून व पुढून मला घेरले आहेस, आणि माझ्यावर तू आपला हात ठेवला आहेस.
6 हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे; ते खूप अगम्य आहे, ते मी समजू शकत नाही.
7 मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निसटून जाऊ शकतो? मी तुझ्या सान्निध्यापासून कोठे पळून जाऊ शकतो?
8 मी जर वर आकाशात चढलो तर तिथे तू आहेस; जर मी खाली मृत्यूलोकात अंथरूण केले तरी, पाहा, तेथे तू आहेस.
9 जर मी पहाटेचे पंख धारण करून आणि समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तू आहेस.
10 तरी तिथे ही तुझा उजवा हात मला धरतो. आणि तू मला हाताने धरून नेतोस.
स्तोत्र. 139 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी