Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 138:1-6 in Marathi

Help us?

स्तोत्र. 138:1-6 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 दाविदाचे स्तोत्र मी अगदी मनापासून तुझी उपकारस्तुती करीन; मी देवांसमोर तुझी स्तोत्रे गाईन.
2 मी तुझ्या पवित्र मंदिराकडे नतमस्तक होऊन, तुझ्या कराराची विश्वासयोग्यता आणि तुझ्या सत्याबद्दल तुझ्या नावाची उपकारस्तुती करीन. तू आपल्या संपूर्ण नावापेक्षा आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहेस.
3 मी तुला हाक मारली त्याच दिवशी तू मला उत्तर दिलेस. तू मला उत्तेजन दिले आणि तेव्हा माझ्या जिवाला सामर्थ्य प्राप्त झाले.
4 हे परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझी उपकारस्तुती करतील, कारण त्यांनी तुझ्या मुखातील शब्द ऐकले आहेत.
5 खरोखर, ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील कारण परमेश्वराचा महिमा अगाध आहे.
6 कारण परमेश्वर थोर आहे तरी तो दीनांकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखतो.
स्तोत्र. 138 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी