Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 137:1-7 in Marathi

Help us?

स्तोत्र. 137:1-7 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आम्ही बाबेलाच्या नद्यांजवळ खाली बसलो; आणि जेव्हा आम्ही सियोनेविषयी विचार केला तेव्हा रडलो.
2 तेथील वाळुंजावर आम्ही आमच्या वीणा टांगल्या.
3 तेथे आम्हास पकडणाऱ्यांनी आम्हास गाणी गावयाला सांगितले आणि आमची थट्टा करणाऱ्यांनी आम्ही त्यांच्यासाठी करमणूक करावी म्हणून आम्हांस म्हणाले, सीयोनाच्या गाण्यांतले एखादे गाणे आम्हांला गाऊन दाखवा.
4 परक्या देशात आम्ही परमेश्वराचे गाणे कसे गावे?
5 हे यरूशलेमे, मी जर तुला विसरलो, तर माझा उजवा हात आपले कौशल्य विसरो.
6 जर मी तुला विसरलो, जर मी यरूशलेमेला आपल्या आनंदाच्या मुख्य विषयाहून अधिक मानले नाही तर माझी जीभ माझ्या टाळूला चिकटो.
7 हे परमेश्वरा, अदोमाविरूद्ध यरूशलेमेच्या त्या दिवसाची आठवण कर, ते म्हणाले, ती पाडून टाका, पायापर्यंत पाडून टाका.
स्तोत्र. 137 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी