Text copied!
Bibles in Marathi

स्तोत्र. 136:12-22 in Marathi

Help us?

स्तोत्र. 136:12-22 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 ज्याने सामर्थ्यी हाताने आणि बाहू उभारून त्यांना बाहेर आणले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
13 ज्याने लाल समुद्र दुभागला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
14 ज्याने इस्राएलाला त्यामधून पार नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
15 ज्याने फारोला आणि त्याच्या सैन्याला लाल समुद्रात उलथून टाकले. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
16 ज्याने आपल्या लोकांस रानातून नेले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
17 ज्याने महान राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
18 आणि ज्याने प्रसिद्ध राजांना मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
19 ज्याने अमोऱ्यांच्या सीहोन राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
20 आणि ज्याने बाशानाच्या ओग राजाला मारून टाकले, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
21 आणि ज्याने त्यांचा देश वतन असा दिला, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
22 ज्याने तो इस्राएल त्याचा सेवक याला वतन म्हणून दिला. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
स्तोत्र. 136 in इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी